

Anna Bhau Sathe memorial hunger strike in Shirur by Lahuji Shakti Sena demanding memorial and welcome arch
Sakal
शिरूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात उचित स्मारक व्हावे तसेच शहरातील लाटेआळी व इंदिरानगर परिसरात अण्णाभाऊंच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेचे राज्य सहसचिव दादाभाऊ लोखंडे व शहर उपाध्यक्ष विनोद उर्फ पप्पू साठे यांनी आजपासून नगर परिषदेच्या मंगल कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. शहर व परिसरातील विविध संस्था संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.