esakal | पद्मावती कै. काकासाहेब गाडगीळ उद्यान तलावातील मासे मेल्याने दुर्गंधी
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मावती कै. काकासाहेब गाडगीळ उद्यान तलावातील मासे मेल्याने दुर्गंधी

पद्मावती कै. काकासाहेब गाडगीळ उद्यान तलावातील मासे मेल्याने दुर्गंधी

sakal_logo
By
अजित घस्ते

सहकारनगर : पद्मावती कै. काकासाहेब गाडगीळ उद्यानमधील तलावातील कारंजे अनेक दिवसांपासून बंद असल्याने तलावातील पाणी दुर्गंधी झाल्याने तलावातील मासे मेल्याने पाण्यावर तरंगत आहेत. यामुळे पाण्याचा वास येऊन दुर्गंधी पसरली आहे.आताच कुठे उद्यान खुली केली असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांना बरोबर 10 वर्ष पुढील मुले ही उद्यान फिरण्यासाठी येत असतात.

मात्र येथील कारंजे बंद असल्याने आणि पाणी अस्वच्छ असल्याने तलावातील पाणीचा वास येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे उद्यानातील तलाव मधील पाणी स्वच्छ करून कारंजे चालू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यावेळी भानुदास ढोबळे (इंदिरा सोसायटी पद्मावती) म्हणाले, "पद्मावती कै. काकासाहेब गाडगीळ उद्यानात फिरण्यासाठी जात असतो मात्र दोन दिवसांपासून तलावातील पाण्याचा वास येत होता. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने  तलावातील पाणी स्वच्छ करावे आणि उद्यानातील दुरुस्ती व योग्य देखभाल करावी."

यावेळी सर्जीराव काळे (उद्यान निरीक्षक)म्हणाले, "कै. काकासाहेब गाडगीळ उद्यान पद्मावती येथील तलावातील मासे मेल्याने दुर्गंधी पसरली आहे.कोरोनाच्या काळात उद्यान बंद होते. दोन दिवसांपासून कारंजे चालू केले आहेत यापुढे कारंजे नियमितपणे चालू केले जातील."

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

उद्यान सकाळी 6 ते 9 व सायंकाळी  4 ते 7 पर्यत चालू असून नागरिक फिरण्यासाठी येत आहे. १० पुढील मुलांना प्रवेश दिला जात आहे. मनपाचे मत्स्य प्रमुख

अभय कौलगुड म्हणाले, "कै काकासाहेब गाडगीळ उद्यानातील तलावातील कारंजे बंद असल्याने मासेना ऑक्सिजन कमी पडत असल्याने मासे मरत आहेत. कारंजे चालू केल्यावर पाणी स्वच्छ राहते व पाण्यातील ऑक्सिजन मासांना मिळतो. त्यासाठी येथील कारंजे चालू करण्याच्या सूचना संबंधीताना दिल्या आहेत."

loading image
go to top