Wagheshwar Temple : वाघोलीत वाघेश्र्वर मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

महाशिवरात्री निमित्त वाघोलीतील वाघेश्र्वर मंदिरात लाखो भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला.
Wagheshwar Temple
Wagheshwar Templesakal
Updated on

वाघोली - महाशिवरात्री निमित्त वाघोलीतील वाघेश्र्वर मंदिरात लाखो भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंगळवारी रात्री अभिषेक झाल्यानंतर भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

वाघेश्वर मंदिर हे पुरातन व प्रसिद्ध मंदिर आहे. महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री 12 नंतर मंदिर विश्वस्त यांचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली.

रात्री पासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग सुरू झाली. सकाळी अर्धा किलोमीटर पर्यंत दर्शन रांग गेली होती. गर्दी अभावी गाभाऱ्यात प्रवेश न देता बाहेरूनच दर्शन असल्याने भाविकांना सुलभ दर्शन घेता आले. मंदिरा बाहेर पारायण व भजन ही सुरू होते.

जय गणेश ग्रुपच्या वतीने सुमारे सात हजार लिटर लस्सी, कावेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या वतीने सहा टन केळे, विजय गायकवाड व काकासाहेब सातव परिवाराच्या वतीने ३० ते ३५ हजार भाविकांना बटाटा चिवडा तर पंचगंगा ग्रुपच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.हा प्रसाद घेण्यासाठी ही मोठी रांग होती.

मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तेथील तळ्यात बोटिंगचां आनंद भाविकांनी लुटला. मंदिराच्या बाहेर अनेक दुकाने थाटली होती. तेथे ही खरेदी साठी भाविकांची गर्दी होती. पहाटे वाघेश्वर तरुण मंडळाच्या वतीने महाशिवरात्री पहाटचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही आनंद भाविकांनी लुटला.

मंदिर ट्रस्टला मदतीसाठी भाविक पुढे येत होते. वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव, उपाध्यक्ष रामदास दाभाडे व इतर विश्वस्त, तरुण भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी झटत होते. गाभाऱ्याच्या आतील व्यवस्था पुजारी रवी काळे यांनी केली.

वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com