आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाच्या लक्ष्मी मानेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाच्या लक्ष्मी मानेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Published on

PDR26B09450
लक्ष्मी माने
---
लक्ष्मी माने हिची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची ५५ किलो वजन गटातील खेळाडू लक्ष्मी माने (बी.सी.ए. द्वितीय वर्ष) हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर तिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लक्ष्मी हिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. राजेश कवडे, डॉ. सुशील शिंदे, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com