घबाड षष्ठीचे लक्ष्मीपूजन 

प्रसाद पाठक
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे :  तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या धामधूमीत फुले विक्रेते, फरसाण विक्रेते व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही मंडळी कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील षष्ठीला लक्ष्मीपूजन करतात.

व्यावसायानिमित्त आवश्यक नव्या वह्या म्हणजे रोजमेळ रोजकीर्दचे पूजनही लक्ष्मीपूजनानिमित्त करण्यात आले. ऊस, साळीच्या लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्यही दाखविण्यात आला. मिठाई वाटून फटाके फोडण्यात आले. दूकानेही फूलांनी सजवण्यात आली होती.  नवी पेठ विठ्ठल मंदिर मराठा मंडळाचे विश्वस्त नितीन नवले म्हणाले, ''मंदिरात अनेक वर्षांपासून घबाड षष्ठीला लक्ष्मीपुजन करण्याची पद्धत आहे. आमच्याकडे येथे सकाळी विश्वस्तांच्या उपस्थित लक्ष्मीपूजन झाले. व्यापारी मंडळीषष्ठीला लक्ष्मीपूजन करतात. तर विक्रेते कालिदास नाईक म्हणाले, पिढ्यान् पिढ्या आम्ही घबाड षष्ठीला लक्ष्मीपूजन करतो. दूकान फुलांनी सजवतो.''

Web Title: Lakshmi Pujan of trader in karatik Month