लक्ष्मीबाईंनी रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण केले

लक्ष्मीबाईंनी रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण केले

Published on

लक्ष्मीबाईंच्‍या त्‍यागातून ‘रयत’ची उभारणी

प्राचार्य दीपक ढाणे; भुईंजच्‍या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अभिवादन

भुईंज, ता. १८ : कर्मवीर अण्णांच्या कार्याला खंबीर साथ आणि पाठबळ देण्याचे काम रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी केले. वसतिगृहातील सर्व मुले आणि मुली माझी आहेत, या भावनेने त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपुलकीने माया दिली. आपले सर्व सुवर्णलंकार आणि सौभाग्याचे लेणे सुद्धा त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अर्पण केले, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य दीपक ढाणे यांनी केले.
भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्‍ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्‍या पुण्यतिथीप्रसंगी अभिवादन करताना ते बाेलत हाेते.
ते म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य खूप मोठे आहे. ज्यामुळे आज बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. कर्मवीर अण्णांच्या कार्याला खंबीर साथ आणि पाठबळ देण्याचे काम लक्ष्मीबाईंनी दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी लक्ष्मीबाईंची प्रकृती खालावली तेव्‍हा त्यांनी वसतिगृह अधीक्षकांना बाेलावून, उद्या माझे जर काही बरे वाईट झाले तरी सर्व विद्यार्थ्यांना पाडव्यानिमित्त गोड खाऊ घाला, पाडव्याचा नवीन वर्षाचा पहिला सण आहे, मुले उपाशी राहू नये, असे सांगितले हाेते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्याविषयी मनोगते व्यक्त केली. स्वाती नष्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्या आदलिंगे यांनी प्रास्‍ताविक केले.

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com