ठरलं, आळंदी- पंढरपूर महामार्गाचे भूसंपादन होणार, असा मिळणार परतावा 

road
road

गराडे (पुणे) : आळंदी- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ (पालखी महामार्ग) रुंदीकरण आणि बाह्यवळणाच्या भूसंपादनाच्या जमीन मोजणीसाठी शेतक-यांनी परवानगी दिली. त्यामुळे महामार्ग रंदीकरणाच्या कामाला यानिमित्ताने हिरवा कंदिल मिळाल्यामुळे अधिकार्यांच्यात विश्वास निर्माण झाला.
  

दिवे (ता. पुरंदर) येथील सरस्वती मंगल कार्यालय व झेंडेवाडी येथे शेतकरी व अधिकारी यांच्यात आमदार संजय जगताप यांनी मध्यस्तीने बैठक झाली. या वेळी उपस्थित बाधित शेतक-यांनी आमदारांच्या मध्यस्तीने जमीन मोजणी  करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. या वेळी भूसंपादन क्रमांक २२ उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, राष्ट्रीय महामार्गाचे महाप्रबंधक सुहास चिटणीस, उपप्रबंधक अनिल गोरड यांसह भूमी अभिलेखचे अधिकारी आणि दिवे, काळेवाडी, पवारवाडी आदी दिवे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. 

या वेळी शेतक-यांनी रस्त्याच्या मध्यावरून दोन्ही बाजूने समान अंतरावर भूसंपादन करावे, दिवे पंचक्रोशी पीएमआरडीमध्ये येत असल्याने आता होणा-या भूसंपानंदासाठी शहरी भागाप्रमाणे जमिनीचा मोबदला मिळावा. अनेक शेतक-यांची सातबारा आणि प्रत्यक्षातील जमीन यातील फरक भूमी अभिलेख विभागाने शेतक-यांना काढून द्यावा, अशा मागण्या करीत जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याची परवानगी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भागात तीन वर्षांतील जास्तीत जास्त किमतीने झालेले खरेदी खत अथवा रेडी रेकनरदार यातील जास्त किंमत असेल त्याच्या तीन पट परतावा दिला जाईल. तसेच, यामध्ये घरे, झाडे आदींचाही योग्य परतावा शेतक-यांना दिला जाईल. महामार्ग ४५ मीटर असून, यामध्ये रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूंनी साडेबावीस मीटर जमिनीची अधिग्रहण केले जाईल, असे महामार्ग विभागाचे सुनील गाढे यांनी सांगितले.   

सर्व मोबदला दिल्यानंतर टेंडर                   महामार्गाच्या सर्वप्रमथम जमीन मोजणीस सुरुवात होईल. त्यासाठी मोजणी करून सीमेवर खांब रोवले जातील. त्यामुळे शेतक-यांना स्वतःच्या हद्दीची माहिती होईल. तसेच, भूमी अभिलेख विभाग मोजणी करून किती क्षेत्र जाईल, किती राहील याची माहिती देईल. भूसंपादन विभाग जमीन त्यावरील झाडे, घरे, विहिरी आदींची योग्य किंमत करून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मोबदला मिळण्यासाठी माहिती पाठवेल आणि राष्ट्रीय महामार्ग शेतक-यांना भूसंपादनाचा सर्व मोबदला अदा करूनच त्यांनतर टेंडर काढून रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com