Pune Land Acquisition
sakal
पुणे - पुणे महापालिकेला भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्षात जागा ताब्यात येण्यासाठी वर्षवर्ष वाट पाहावी लागते. पण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेत पुरेशी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे अवघ्या तीन महिन्यात जागा ताब्यात आली आहे. ही पाच गुंठे जागा ताब्यात घेऊन तेथील इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.