कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्याचे अनेक दिवस रखडलेले भूसंपादनाचे काम अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. भूमिअभिलेख खात्याच्या माध्यमातून या रस्त्याच्या मोजणीच्या कामाला वेग देण्यात आला असून, कात्रज भागातील मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. कोंढवा भागातील मोजणीचे काम पुढील दोन ते तीन दिवसांत ते पूर्ण होणार आहे.