pune ring road work
sakal
पुणे - पुणे शहराच्या भोवती ८३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड साकराण्यात येणार असून, त्यासाठी भूसंपादन करण्याच्या कामाला गती आली आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोडसाठी २१ गावांपैकी आठ गावांतील सुमारे ३९ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत निधी उभारमी करून प्रत्यक्ष भूसंपादन सुरु होऊ शकेल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज दिली.