
हडपसर : साडेसतरानळी येथील रेल्वे गेटच्या अंडरपाससाठी (भुयारी मार्ग) विश्वासात न घेता थेट नोटीस पाठवून भूसंपादन प्रक्रिया राबविण्याला येथील भूमिपुत्रांनी विरोध दर्शविला आहे. ‘आमचा विकासकामांना विरोध नाही; मात्र चुकीच्या पद्धतीने आम्ही काम होऊ देणार नाही,’ अशी भूमिका घेत येथील शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध करून परत पाठविले.