Land Dispute : शेतीच्या वादातून थरकाप... चुलत भावांचा अमानुष हल्ला, हात, पाय तोडले
Crime News : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शेतीच्या वादातून कैलास हगारे यांच्यावर चुलत भावांनी हल्ला करून एक हात व पाय तोडला. मुलीसमोर झालेल्या या क्रूर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पाटस : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शेतीच्या वादातून मुलीच्या डोळ्यादेखत वडिलांचा एक हात व पाय तोडला. याप्रकरणी पोलिसांनी चुलत भावासह सहा जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यामधील दोघांना अटक केली आहे.