दीड कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा

दीड कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा
Published on

दीड कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : जमीन विक्री व्यवहाराच्या नावाखाली सहा जणांनी एकाकडून इसाऱ्यासह १ कोटी ५१ लाख २० हजार रुपये घेऊन संगनमताने जमीन दुसऱ्यालाच विकली. सहा जून २०२५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विजापूर रोड परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी त्या सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत कोळी, बुद्धव्वा करणाक, महानंदा खडाखडे, सुनीता माने, निर्मला कोळी, अंबूबाई रामपुरे (सर्व रा. लोधी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित गोरख देशमुख (वय ३९, रा. ४३, द्वारकेशनगर, विजापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितांनी जमीन विक्रीचा व्यवहार करून फिर्यादीकडून इसारा म्हणून १ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख रुपये घेतले. सोरेगाव येथील गट क्र. २०/१ मधील क्षेत्रफळ ०६ हेक्टर ७८ आर जागेबाबत १ डिसेंबर २०२५ रोजी साठेखत (क्र. ८९३०/२५ व रजि. कुलमुखत्यारपत्र क्र. ८९३१/२५) केले. त्यानंतर संशयितांनी देशमुख यांना माहिती न देता संगनमताने परस्पर ही जमीन रविकांत कांबळे यांना विकली. तसेच २१ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या नावे (दस्त क्र. ९३३३/२६) करून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com