जमीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जमीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Published on

जमीन खरेदी योजनेसाठी मागविले प्रस्ताव
सबलीकरण व स्वाभिमान योजना; अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील पात्र भूमिहीनांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ राबविण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर जमीन या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव मागविले आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र भूमिहीन व्यक्तींना ४ एकर जिरायती जमीन प्रति एकरी ५ लाख रुपये किंवा २ एकर बागायती जमीन प्रति एकरी ८ लाख रुपये या कमाल मर्यादेत खरेदी करून देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ६० वर्षे असावे. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या गावातील पात्र लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या गावातील पात्र व्यक्तींना जिल्हा समितीच्या मान्यतेने लाभ दिला जाईल.
या योजनेत परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्त लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत गायरान किंवा सीलिंग जमीन वाटप झालेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. योजनेअंतर्गत मिळालेली जमीन लाभार्थ्याने स्वतः कसणे बंधनकारक असून, ती जमीन अन्य व्यक्ती किंवा संस्थेस विक्री, हस्तांतरण किंवा भाडेपट्ट्याने देता येणार नाही. विक्रीसाठी प्रस्तावित जमीन विनाबोजाची, वादमुक्त, चांगल्या प्रतीची व सलग स्वरूपातील असावी. खडकाळ, क्षारयुक्त, डोंगरउतारावरील किंवा नदीपात्राजवळील जमीन स्वीकारली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com