esakal | भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण

बोलून बातमी शोधा

Land}

‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत.

भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त
खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने परिसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहाराला लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यावासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. 

मात्र, या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीनी विकायच्या नाहीत, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे.जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना ‘तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचा का प्लॉट? मग काय रेट होईल?’, अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट, असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे, असे प्रकार होऊ लागले आहेत.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

1) लॉकडाउननंतर जमीन खरेदी-विक्री तेजीत
2) एजंटांचे जमीन विक्रीबाबत मालकांना फोन
3) जमिनींची कागदपत्रे परस्पर बाजारात
4) कमिशन मिळविण्यासाठी एजंटांची खटाटोप
5) शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर डोळा

आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त झालो आहे. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली, याचा शोध घेऊन मी पोलिसात तक्रार देणार आहे.
- दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर)

Edited By - Prashant Patil