वनपुरी येथे शेतातून ३० ब्रास मुरूम चोरी

वनपुरी येथे शेतातून
३० ब्रास मुरूम चोरी
Published on

​सासवड, ता. १४ : वनपुरी (ता. पुरंदर) येथे सामाईक शेतजमिनीतील ३० ब्रास मुरूम चोरून नेल्याप्रकरणी आणि विचारणा केली असता शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
​याप्रकरणी तनवीर कयुम शेख (वय ४१, रा. हडपसर, मूळ रा. वनपुरी) यांनी फिर्याद दिली असून, सुनील महादेव गायकवाड (रा. वनपुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेख यांची वनपुरी येथे जमीन आहे. २४ एप्रिल रोजी ते शेतात गेले असता आरोपी गायकवाड यांनी तेथील मुरूम काढून विक्री केल्याचे निदर्शनास आले. यानंतर २९ एप्रिल रोजी तलाठ्यांमार्फत या जागेचा पंचनामा केला. सुरुवातीला सासवड पोलिस ठाण्यात झालेल्या चर्चेत आरोपीने मुरूम भरून देण्याचे व हद्द निश्‍चित होईपर्यंत कोणताही गैरप्रकार न करण्याचे मान्य केले. मात्र, १३ मे रोजी फिर्यादी शेतात गेले असता आरोपीने त्यांच्या २३ गुंठे क्षेत्राचे तारेचे कुंपण तोडून संपूर्ण ७२ गुंठे क्षेत्रावर स्वतःच्या नावाची पाटी लावून तेथे खडी आणून टाकली होती. याबाबत जाब विचारला असता, आरोपीने फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. शेख यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com