भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 
तीन घरमालकांवर गुन्हे
Published on

लोणी काळभोर, ता. ६ : भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात नोंदविण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तीन घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विशेष शाखेच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली असून, पोलिसांनी घरमालकांना कडक इशारा दिला आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक केले आहे. मात्र, लोणीगाव येथील रोहिणी कॉम्प्लेक्समधील घरमालक वागसिंग आणि रोहिणी संजय वाघुले यांनी अनुक्रमे सूरज गास्वामी व मिलिंद शिंदे या भाडेकरूंची माहिती नोंदवली नव्हती. तसेच, घोरपडेवस्ती येथील श्रीराम निवासचे मालक दत्तात्रेय बाबूराव खुणे यांनीही भाडेकरू कुणाल साळुंखे यांची माहिती पोलिसांना दिली नसल्याचे आढळले. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com