जुन्नर : मुसळधार पावसाने इंगळूण ते आंबे-हातवीज घाट रस्त्यात (बुधवारी ता.१८) अनेक ठिकाणी दरड,माती, झाडे-झुडपे कोसळली आहेत. यामुळे घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला असून पठारावरील गावांचा व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे..डोंगर माथ्यावर असणाऱ्या पठारावर सुकाळवेढे,पिंपरवाडी,आंबे, हातवीज,लेंभेवाडी,कोकणेवाडी आदी गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या दळणवळणाचा हा एकच मार्ग आहे. या मार्गावरील अडचणीबाबत पाचही गावच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र देऊन पावसाळ्यात घाटातील होणाऱ्या दुरावस्थेची दखल घ्यावी अशी विनंती केली होती.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही यामुळे आज ही स्थिती झाली असल्याचे हातवीजचे माजी पोलीस पाटील अनंता पारधी यांनी सांगितले..जुन्नर पासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ह्या गावांच्या वाहतूक सुविधेसाठी घाटाचे रुंदीकरण केले परंतु बाजूने पाणी जाण्यासाठी गटार अद्याप काढली नाही.या ठिकाणी सरासरी १५०० ते २००० मिली मीटर पाऊस पडतो. डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खराब होतो. दरड कोसळण्याची भीती असते.यासाठी घाटरस्त्याचे वळणावर ठिक ठिकाणी कठडे बांधावेत गटर काढावी यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढेल असे निवेदनात नमूद केले आहे..घाटरस्त्यावर येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटर तसेच आवश्यक तेथे मोऱ्यां काढणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत असते यामुळे वाहन चालविणे जोखमीचे होते.पावसाळ्यात आजारी व्यक्तीला जुन्नरला दवाखान्यात न्यायचे असेल तर अडचणीचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे..पिंपरवाडीचे पोलीस पाटील विष्णू घोडे यांनी आदिवासी बांधवाना मुलांच्या शाळा प्रवेश तसेच शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे, दाखले काढण्यासाठी जुन्नरला यावे लागते त्यांची होणारी गैरसोय दूर करावी. रस्त्यावर येणारे पाणी योग्य ठिकाणी काढून द्यावे, रस्त्यावरील झाडे-झुडपे,दगड गोटे तसेच मातीचा मलबा काढून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.