वाई:-भाषा माणसाला समृद्ध बनवते: मदन भोसले. ''किसन वीर''मध्ये भाषा विषयांवरील राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न.

वाई:-भाषा माणसाला समृद्ध बनवते: मदन भोसले. ''किसन वीर''मध्ये भाषा विषयांवरील राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न.

Published on

व्यक्तिमत्त्व विकासात भाषेला महत्त्वाचे स्थान

मदन भोसले; ‘किसन वीर’मध्ये भाषा विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

वाई, ता. २२ : गेल्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भाषा माणसाला समृद्ध बनविते, असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले.

येथील किसन वीर महाविद्यालयात मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी विभाग आणि अंतर्गत दर्जा हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘२१ व्या शतकातील बदलते साहित्यप्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्‌घाटन झाले. यावेळी बीजभाषक म्हणून डॉ. ए. एम. सरवदे, प्राचार्य डॉ. सुनील सावंत, उपप्राचार्य डॉ. विनोद वीर यांची उपस्थिती होती.

श्री. भोसले म्हणाले, ‘‘भारतीय भाषांतील साहित्याला गौरवशाली परंपरा आहे. वसाहतोत्तर साहित्याने शोषित, दुर्लक्षित, आदिवासी जीवनातील वास्तव, अन्याय आणि संघर्ष मांडला आहे.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘जीवन आणि साहित्य नेहमी प्रवाहित असते. त्यामुळे चर्चा होताना मानवी जीवनाची आणि साहित्याची व्हायला हवी. युरोपियन लोकांनी भाषेला महत्त्व दिले आहे. आपणही भाषेसंदर्भातील जगभरातील संकल्पनांचा मागोवा घ्यायला हवा. प्रत्येक देशाची जडणघडण वेगळी असते. आपला देश बहुभाषिक आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. आपली समृद्ध संस्कृती नव्याने समजून घ्यायला हवी. पूर्वीच्या साहित्यातील पोटाच्या भुकेची जागा आज हव्यासाच्या भुकेने घेतली आहे.’’ १९६० नंतरच्या साहित्यातील स्थित्यंतरेही त्यांनी सांगितली.

प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, ‘‘जीवनात येणाऱ्या अडचणी साहित्यात प्रतिबिंबित होतात. साहित्यातून मांडलेल्या नवकल्पना देशाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक तांत्रिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील विकास घडवून आणण्यासाठी दिशादर्शक होऊ शकतात.’’

डॉ. बाळकृष्ण मागाडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. धनंजय निंबाळकर यांनी परिचय करून दिला. सुमती कांबळे, रेश्माबानो मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. दीक्षा मोरे यांनी आभार मानले.

.........
चाैकट
...........
शोधनिबंध सादरीकरण
पहिल्या सत्रात डॉ. ए. एम. सरवदे यांचे बीजभाषण झाले. दुसऱ्या सत्रात डॉ. सुभाष वाघमारे (सातारा), डॉ. मृणालिनी शिंदे (कऱ्हाड), डॉ. विजयकुमार रोडे, डॉ. हणमंत लोखंडे (पुणे) यांनी साहित्यातील बदलत्या प्रवाहांवर प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात युवराज खरात (रहिमतपूर), अनंत निकम (कऱ्हाड), डॉ. भारत खिलारे (पाचवड), डॉ. धनंजय साठे (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंध सादरीकरण झाले. सचिव डॉ. जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. डॉ. संग्राम थोरात यांनी चर्चासत्राचे अहवालाचे वाचन केले.


B07609
वाई : चर्चासत्रात बोलताना मदन भोसले. त्या वेळी डॉ. गुरुनाथ फगरे व मान्यवर.
....................................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com