खडकवासला-सिंहगडावर तुफान गर्दी

घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी; अनेक पर्यटक, दुर्गप्रेमी अर्ध्यातून माघारी
Large Crowd at Khadakwasla Sinhagad
Large Crowd at Khadakwasla SinhagadSakal

किरकटवाडी - खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगडावर रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. खडकवासला धरण चौकापासून ते केंद्रीय विद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर सिंहगडाच्या घाटरस्त्यावरही कोंढणपूर फाट्याच्या पुढे गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. परिणामी अनेक पर्यटक व दुर्गप्रेमी अर्ध्यातून माघारी फिरल्याचे दिसून आले.

रविवारची सुट्टी व ढगाळ वातावरण असल्याने सकाळपासूनच खडकवासला, सिंहगड व पानशेत परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. खडकवासला धरण चौपाटी परिसरात नेहमीप्रमाणे अनेक नागरिकांनी बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने इतर वाहनांना ये-जा करताना अडथळा निर्माण झाला. तसेच काही नागरिक गर्दीत वाहने वळवत असल्याने त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत होती. हवेली पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते परंतु पर्यटकांच्या संख्येपुढे पोलीस हतबल झाल्याचे दिसत होते.

सिंहगडावर 2341 दुचाकी व 674 चारचाकी अशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 3015 वाहने गडावर गेली होती. यातून 1 लाख 84 हजार 450 रुपये महसूल जमा झाला. सिंहगड घाटरस्त्यावरही कोंढणपूर फाट्याच्या पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी अनेक पर्यटक व दुर्गप्रेमी कोंढणपूर फाट्यापासूनच वाहने वळवून परत जाताना दिसत होते.

"दोन ते तीन तास झाले मी घाटरस्त्यावर गाडी बाजूला लावून थांबून आहे.गाडीतील सर्वजण चालत सिंहगडावर गेले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन असायला हवे."

- संजय जाधव, वाहचालक, बारामती.

"कंपनीची सहल होती म्हणून आम्ही सिंहगडावर निघालो होतो. घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहून पुढे गेलो नाहीत."

- समिक्षा जैन, विमाननगर.

"शनिवार व रविवारी आम्ही सर्व पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात करत आहोत. गर्दी नियंत्रणाबाहेर होत आहे. तसेच येणारे नागरीकही सहकार्य करत नाहीत."

- तेगबीरसिंह संधु, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com