
पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयाचे कामकाज 15 टक्के मनुष्यबळात आज सुरू झाले आहे. मात्र आता नियमित सुनावणी सुरू झाल्याच्या समजुतीतून शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेटवर शेकडो पक्षकार आणि वकिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.
दरम्यान, सकाळपासून झालेली ही गर्दी आटोक्यात आणताना पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली. 'काम असल्याशिवाय न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे गर्दी करू नका असे' आवाहन केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्यात आणण्यात यश आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे 23 मार्चपासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. लॉकडाउनच्या काळात न्यायालयात सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत केवळ तात्काळ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आठ जूनपासून योग्य त्या उपाययोजना करून दोन शिफ्टमध्ये राज्यातील न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार सर्व खबरदाऱ्या घेवून ठराविक प्रकरणांवर सूनवणी सुरू झाली आहे. मात्र आपल्या प्रकरणाचे काय आहे?, पुढील तारीख कधी आहे?, जामीन मिळणार का? न्यायालय बंद असताना त्यावर काही सूनवणी झाली का? अशा एक ना अनेक शंकाचे निरसन करून घेण्यासाठी अनेक वकील व पक्षकार न्यायालयात आले होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, महत्वाचे काम असल्याशिवाय वकील व पक्षकारांना न्यायालयात येऊ नये. काम झाले की लगेच न्यायालयाच्या बाहेर निघून यावे, आदी सूचना असोसिएशनकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. असे असताना असे असताना देखील वकील आणि पक्षकारांनी न्यायालयात गर्दी केली होती. मात्र असोसिएशनचे पदाधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आव्हान केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्यात आली.
यापुढे न्यायालयामार्फत दररोज पुढील दोन दिवसांच्या कामाचा बोर्ड देण्यात येणार आहे. तो वकिलांच्या व्हॅटसअँपवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या खटल्याची तारीक आहे त्यानेच न्यायालयात यावे व विनाकारण गर्दी करू नये. कोरोनाच्या सावट अजून दूर झालेले नाही. त्यामुळे वकील, पक्षकारांनी विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये. जर गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा न्यायालय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वकील आणि पक्षकारांनी प्रशासनला सहकार्य करावे. -ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.