महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ; अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना होणार फायदा

सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
Maharashtra Cabinet
Maharashtra Cabinet sakal
Updated on
Summary

सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

पुणे - सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात (Share Capital) मोठी वाढ (Increase) करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ (Mantrimandal) बैठकीत घेण्यात आला आहे. महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. तर, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाला पाचशे कोटींची वाढीव मर्यादा देण्यात आली आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा यापूर्वी पाचशे कोटी होती. ती वाढवून एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा तीनशे कोटींवरून एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी सुमारे ७३ कोटी होती. ती देखील वाढवून एक हजार कोटी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५० कोटींवरून पाचशे कोटी करण्यात आली आहे.

या चारही महामंडळांचे भागभांडवल वाढविल्यामुळे अनुसूचित जातीतील लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कौशल्य विकासाच्या योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार आहे, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com