पुण्यातील ही धरणे एकाच दिवसात निम्म्यावर 

विजय जाधव
Wednesday, 5 August 2020

भोर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर आणि नीरा देवघर धरणामधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात भाटघर धरणातील पाणी साठ्यात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

भोर (पुणे) : भोर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर आणि नीरा देवघर धरणामधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात भाटघर धरणातील पाणी साठ्यात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

भाटघर धरणात मंगळवारी (ता. ४) ४१ टक्के पाणीसाठा होता. मागील २४ तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज बुधवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजेपर्यंत धरणात ५१.६७ टक्के पाणीसाठा झाला, तर नीरा देवघर धरणात ३९ टक्के पाणीसाठा झालेला आहे. २३.७३ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणात मागील २४ तासात दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर, ११.९३ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात मागील २४ तासात १.६ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नीरा देवघर धरण खोऱ्यात मागील २४ तासात सर्वाधिक १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर भाटघर धरण खोऱ्यात १३५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. अजूनही तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. अशाच प्रमाणात पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठ- दहा दिवसांमध्ये दोन्ही धरणे भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in water storage of Bhatghar and Nira Devghar dams