Pune : अकरावीच्या प्रवेशाची अंतिम संधी

गुरुवारपर्यंतच घेता येणार प्रवेश
admissions
admissionssaka

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी येत्या गुरुवारपर्यंत दैनंदिन गुणवत्ता फेरी म्हणजेच सतत विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी ही अंतिम संधी असणार आहे.

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रवेशाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे.

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्या आणि २६ सप्टेंबरपासून दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही आणखी काही निवडक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

अकरावीचे प्रथम सत्र संपत आले असताना प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळावी, म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी ही अंतिम संधी असेल. त्याअंतर्गत कार्यवाहीचे टप्पेही संचालनालयाने प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यानंतर २०२२-२३ मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि नवीन प्रवेशाची कार्यवाही बंद करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना :

- नवीन विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन /नवीन नोंदणी सुरू असेल, पण ती केवळ १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

- प्रवेश अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना भाग दोन आणि महाविद्यालयांना पसंती देऊन फेरीमध्ये सहभागी होता येईल.

- विद्यार्थ्यांने आपली प्रतीक्षा यादीतील रॅंक तपासून दररोज भाग दोनमध्ये पसंती नोंदविणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com