पुणे महापालिकेत लेट कमर्सना नोटिस; कोणत्या विभागात झाली कारवाई?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बेशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचे बजावूनही उशिराने कामावर आलेल्या आरोग्य खात्यातील 21 कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी म्हणजे, बुधवारी नोटिसा देण्यात आल्या. "कार्यालयात उशिराने आलात, या पुढे तसे झाल्यास कारवाईला पात्र असाल,' अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांना समज दिली आहे.

पुणे - कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बेशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचे बजावूनही उशिराने कामावर आलेल्या आरोग्य खात्यातील 21 कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी म्हणजे, बुधवारी नोटिसा देण्यात आल्या. "कार्यालयात उशिराने आलात, या पुढे तसे झाल्यास कारवाईला पात्र असाल,' अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांना समज दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महापालिकेचे रुग्णालये, दवाखाने आणि महापालिकेच्या मुख्य इमारतीतील आरोग्य अधिकारी - कर्मचारी उशिराने येतात. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे. अधिकारी - कर्मचाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी आरोग्य खात्याने पहिल्यांदाच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याआधी पत्र पाठवून सूचनाही केल्या होत्या. तरीही 21 कर्मचारी वेळेत आले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना नोटीस दिल्याचे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: late Commerce notice and crime by municipal