
पुणे - राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार आता तिसऱ्या फेरीची गुणवत्ता व निवड यादी आणि महाविद्यालयांचा कट-ऑफ येत्या शुक्रवारी (ता. २५) जाहीर होणार आहे.