लातूर मुलांचा बुडून मृत्यू

लातूर मुलांचा बुडून मृत्यू
Published on

लातूरमध्ये तलावात
बुडून दोन मुलांचा मृत्यू

बोधेनगर भागातील दुर्घटना : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १७ : शहरातील बोधेनगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, खेळत असताना साठवण तलावात पडून दोन लहान मुलांचा रविवारी (ता. १७) मृत्यू झाला. दिव्या नवनाथ उबाळे (वय ६) व कार्तिक भरत कांबळे (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बोधेनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यापासून जवळच साठवण तलाव तयार करण्यात आला होता. येथे टँकरसाठी पाणी साठवले जात होते. पण त्याभोवती पक्के कुंपण उभारण्यात आले नव्हते. खेळता खेळता ही दोन मुले पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. साठवण तलावतील पाणी जागा मालकाकडून टँकरद्वारे वसतिगृहांना विकले जात होते. काही वर्षांपासून हा व्यवसाय सुरू होता. मात्र, हा साठवण तलाव धोकादायक असून, यामुळे जीवितहानी होऊ शकते, अशा तक्रारी आयुक्तांकडेही करण्यात आल्या होत्या. पण कसलीही कारवाई झाली नाही, असे स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com