

LTR26B15515
लातूर : येथील ‘उमाटे कुरिअर’च्या पार्सलमध्ये स्फोट झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय.एन., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आदी.
LTR26B15516 कुरिअरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले स्फोटाचे दृश्य.
लातूरमध्ये ‘कुरिअर’च्या
पार्सलमध्ये स्फोट
-
एक गंभीर जखमी; ‘एअर पिस्टल’च्या साहित्याचा स्फोट झाल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३१ : येथील शिवाजीनगर भागातील कुरिअर सर्व्हिसेसच्या एका वाहनातून पार्सल खाली उतरवताना अचानक मोठा स्फोट झाला. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास घडली. दरम्यान, हा स्फोट ‘एअर पिस्टल’साठी वापरल्या जाणाऱ्या ‘कार्टेज’चा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
येथील विलासराव देशमुख मार्गावर उमाटे इंटरनॅशनल कुरिअर सेवा आहे. वेगवेगळ्या कुरिअरचे पार्सल या दुकानात येतात. येथून शहरात वितरित केले जातात. शनिवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास या कुरिअर सेवेच्या (एमएच २४ बी डब्ल्यू ०३९१) या वाहनातून पार्सल खाली काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, नागनाथ स्वामी (वय ५२) यांनी एक पार्सल बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे फेकले, तेव्हा त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात स्वामी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट झाल्यानंतर वाहनाच्या टपाचा काही भाग उडाला. आतमधील सर्व पार्सलच्या चिंधड्या उडाल्या. वाहनचालकाच्या समोरील मोठी काच तुटून बाहेर पडली.
पोलिस यंत्रणा हालली
या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा हलली. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस मंगेश चव्हाण, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय.एन. आदी अधिकारी घटनास्थळी पोचले. नांदेडचे ‘एटीएस’चे सहायक पोलिस निरीक्षक अवेज काझी आदींनी घटनास्थळाला भेट दिली. त्यासोबतच येथील बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाद्वारे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने वाहनातील सर्व संशयित साहित्य बाहेर काढले. फोरेन्सिक पथकानेही संशयित साहित्याचे सर्व नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. चार-पाच तास ही सर्व पथके घटनास्थळावर तपास करीत होती. एअर पिस्टलच्या साहित्याचा स्फोट झाल्याचा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.