

दुष्काळ अर्जांसाठी घेतलेले १०० रुपये परत घ्या
लऊळ तलाठी कार्यालयाचे शेतकऱ्यांना आवाहन; २७०० ते २८०० अर्जांमधून लाखोंची वसुली झाल्याचा संशय
सकाळ वृत्तसेवा
लऊळ, ता. ४ : माढा तालुक्यातील लऊळ येथे दुष्काळ पंचनामा अर्जांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज १०० रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांनी ही डेटा एंट्री मोफत केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तलाठी समाधान पाटील किंवा तलाठी कार्यालयातून भरलेले १०० रुपये परत घ्यावेत, असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले आहे.
लऊळ येथे दुष्काळ पंचनाम्यासाठी सुमारे २७०० ते २८०० अर्ज जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार दोन लाख ७० हजार ते दोन लाख ८० हजार रुपये जमा झाल्याचा हिशेब मांडला जात आहे. ही रक्कम नेमकी कुठे गेली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून रक्कम परत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तलाठी समाधान पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. सर्कल अधिकारी शिंदे यांच्याकडे दुसरा संपर्क क्रमांक आहे का, अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे एकच क्रमांक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
- शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ऑनलाइन माहिती मोफत भरून दिली. त्यामुळे तलाठी कार्यालयात जमा केलेल्या पैशातून शेतकऱ्यांना शेतसारा भरल्याच्या पावत्या द्याव्यात किंवा त्यांची रक्कम रोख स्वरूपात परत करावी.
- स्वप्नील भोंग, सीएससी चालक, लऊळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.