
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एसएसएलव्हीचे प्रक्षेपण होईल. यामध्ये अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटलाईट-०२ आणि आझादीसॅट या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
पुणे - उपग्रहांची जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्मॉल सॅटलाईट लॉंच व्हेईकलची (एसएसएलव्ही) निर्मिती केली असून, रविवारी (ता.७) सकाळी नऊ वाजून १८ मिनिटांनी त्याचे पहिले प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एसएसएलव्हीचे प्रक्षेपण होईल. यामध्ये अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटलाईट-०२ आणि आझादीसॅट या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आझादीसॅटची निर्मिती ‘स्पॅस किड्झ इंडिया’ या विद्यार्थ्यांच्या चमूने केली आहे. इस्रोकडे सध्या पोलर सॅटलाईट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) आणि जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) हे उपग्रह प्रक्षेपक उपलब्ध आहे. मात्र छोट्या उपग्रहांना पृथ्वी नजीकच्या कक्षेत स्थिर करण्यासाठी या प्रक्षेपकांचा वापर करणे परवडणारे नाही. अशावेळी कमी कालावधीत आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या छोट्या प्रक्षेपकाची गरज होती. ती गरज आता एसएसएलव्हीच्या निर्मितीने भागली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठत भारताचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.
एसएसएलव्हीचे वैशिष्ट्ये -
- प्रक्षेपकाची उंची ३४ मीटर, तर व्यास दोन मीटर
- एकूण वजन ११० किलो
- ५०० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे वहन करू शकतो
- ५०० किलोमीटरपर्यत उपग्रह स्थिर करू शकतो
- १२० टन वजनाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता
- ७२ तासांत जोडणी करता येते
एसएसएलव्हीचे फायदे -
- कमी खर्चात आणि संसाधनांमध्ये छोट्या उपग्रहांचे प्रक्षेपण शक्य
- छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जागतिक बाजारपेठे भारतात येईल
- पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही या प्रक्षेपकांवरील ताण कमी होईल
- इस्रोला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळेल
- कमी कालावधीत प्रक्षेपक तयार करता येतो
उपग्रहांचे वैशिष्ट्ये -
जिओ ऑब्झर्वेशन सॅटलाईट या उपग्रहाची निर्मिती इस्रोने केली असून, यामुळे इन्फ्रारेड बॅन्ड मधील प्रगत ऑप्टिकल रिमोट सेंसिग तंत्रज्ञान देशाला उपलब्ध होणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरातील सरकारी शाळांच्या विद्यार्थिनींनी विकसित केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘आझादीसॅट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहात ७५ पेलोड असून, प्रत्येकाचे वजन जवळपास ५० ग्रॅम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.