आधी वकिलाची भेट, मग लग्नाची गाठ!

सुनील गाडेकर
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे - साखरपुडा ही लग्नाची पहिली पायरी. नंतर मुलगा आणि मुलीमध्ये संवाद वाढतो. त्यातून एकमेकांचा स्वभाव समजायला लागतो. परस्परांच्या अपेक्षाही लक्षात येतात. मात्र या संवादात प्रेमाच्या शब्दांपेक्षा अपेक्षाच जास्त असतील, तर लग्न करावे की नाही, हा प्रश्‍न उभा ठाकतो. पर्यायाने कायदेशीर सल्ल्यासाठी मग तो किंवा ती वकिलांचा दरवाजा ठोठावते. 

प्रेम संबंधातून जमलेल्या लग्नात एकमेकांचे स्वभाव व मागण्या दोघांनाही बऱ्यापैकी माहीत असतात. मात्र कुटुंबीयांनी ठरवलेल्या लग्नातील मुला-मुलीचे पुरेसे बोलणे झालेले नसते. साखरपुड्यानंतरच संवाद वाढतो. तेव्हा आवड-निवड समजल्यानंतर चर्चा आशा-अपेक्षांकडे जाते. एकमेकांची पसंती न जुळल्याने ब-याचदा त्यांचा काही आक्षेप नसतो. पण इच्छा-अपेक्षांमध्ये जुळवून घेतले नाही तर त्यांच्यात नाराजी व रुसवेफुगवे सुरू होतात. लग्नाच्या अटी पटल्या नाहीत तर पुढे जायचे की नाही, याबाबत गोंधळ होतो. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरही मार्ग निघत नसेल तर थेट वकिलांची गाठ घेतली जात आहे.  लग्न जमल्यानंतर काही दिवस लिव्ह-इनमध्ये राहू. अन्यथा वेगळे होऊ, असा प्रस्ताव ठेवला जातो. समजून घेतले तर ते लग्नापर्यंत पोचतात.

मुलींच्या मागण्या
    काही पगार माहेरी देणार
    नोकरीची संधी मिळाली तर परदेशी जाणार
    वैचारिक व आर्थिक स्वातंत्र्य हवे

मुलांच्या मागण्या
    आई-वडील बरोबरच राहतील
    तुझा पगार फक्त आपल्या कुटुंबासाठी वापरायचा
    तुझ्या आई-वडिलांचे आपल्या कुटुंबात लक्ष नको

Web Title: Lawyer Marriage