पुणे - पुण्यात मुंबर्इ उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करावे, या मागणीसाठी येथील विविध वकील संघटनांकडून न्याययंत्रणेला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांनी पुण्याच्या फिरत्या खंडपीठाबाबत १० दिवसांत निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी पुणे बार असोसिएशन (पीबीए) सह जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी केली.