esakal | 'हेच का ते महादेव जानकर अशी म्हणायची वेळ आली'
sakal

बोलून बातमी शोधा

Mahadev Jankar

आज सत्ता गेल्यावर वरिष्ठ सभागृहात प्रश्न उपस्थित करताना दिसले." बैल गेला झोपा केला"अशी त्यांची अवस्था झाली आहे. केविलवाणी धडपड पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या हाच का तो महादेव जानकर अशी म्हणायची वेळ आली आहे.

'हेच का ते महादेव जानकर अशी म्हणायची वेळ आली'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रातील धनगर समाजातील बहुसंख्य तरुणांना रासप हा पक्ष आपल्याला न्याय देईल अशी अपेक्षा होती, म्हणून गेली सोळा वर्षे समाजातील हजारो तरुणांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या पक्षात उडी घेतली, हा पक्ष वाढवला. पण, महादेव जानकर यांनी या आशा आकांक्षा धुळीस मिळवल्या, असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, की भाजपतर्फे विधानपरिषदेवर ज्या दिवशी ते गेले त्या दिवसापासून ते भाजपचे झाले. स्वतःची वेगळी ओळख हरवून बसले. रासपचे विचार विसरले. समाजाला वाऱ्यावर सोडले. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना महायुतीमधील घटक पक्ष आणि नेता म्हणून त्यांची उंची वाढवण्याचे काम केले. महादेव जानकर यांना नेता बनवले. परंतु महादेव जानकर भाजपचा कार्यकर्ता झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर समाजाच्याप्रश्नाकडे ते लक्ष वेधून घेतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी मंत्री पदाचा सर्वात जास्त वेळ प्रवासात घालवला. दिल्ली बेंगळूर करत राहिले. पक्ष खिळखिळा झाला, समाजाच्या महत्वाच्या प्रश्नावर भाजपला साजेल अशी "अळी मिळी गुप चिळी"अशी भूमिका त्यांनी घेतली.

आज सत्ता गेल्यावर वरिष्ठ सभागृहात प्रश्न उपस्थित करताना दिसले." बैल गेला झोपा केला"अशी त्यांची अवस्था झाली आहे. केविलवाणी धडपड पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या हाच का तो महादेव जानकर अशी म्हणायची वेळ आली आहे.
शिवसेना सोडल्यास सर्वच पक्षांनी धनगर समाजाचा मतासाठी वापर केला आहे, हे धनगर समाजाच्या तरुणांना कळून चुकले आहे, असा आरोपही प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

loading image