
पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधिस्थळासमोर असणाऱ्या वाघ्या श्वानाच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून कोल्हापूरचे संभाजीराजे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष असून, किल्ले संवर्धनाऐवजी ते नासधूस करण्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे. त्यांची प्राधिकरणावरून हकालपट्टी करावी,’’ अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत केली.