
पुणे - महापालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता बुधवारी (ता. ११) सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत वाहनविरहित (व्हेर्ईकल फ्री रोड) ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील नगरकर तालीम चौकापासून उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौकापर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.