देशातील मोठ्या ब्रॅंडच्या मधामध्ये चिनी साखरेची भेसळ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंक मध्ये केलेली भेसळीच्या प्रकरणापेक्षा हे प्रकरण मोठे आहे. 13 कंपन्यांपैकी 10 कंपन्यांचे सॅंपल एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. त्यातील तीन कंपन्यांचे सॅंपल भारतीय मानकानूसार नव्हते. 
- सुनीता नारायण, महासंचालक, सीएसई. 

पुणे : देशातील आघाडीच्या 13 मध विक्रेत्या कंपन्यांच्या मधामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आढळल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हार्मेंटल (सीएसई) या संस्थेने केला आहे. यासंबंधीचा अहवालही भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडे (एफएसएसएआय) सुपूर्त करण्यात आला आहे. 

संबंधित कंपन्यांनी 77 टक्‍क्‍यांपर्यंत साखरेची भेसळ आढळून आल्याचे सीएसईने म्हटले आहे. 22 सॅम्पल पैकी फक्त पाच सॅंम्पलने एफएसएसआयने निर्धारित केलेल्या मानकांना पूर्ण केले आहे. जर्मनीच्या प्रयोगशाळेत न्युक्‍लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या माध्यमातून या सॅंपलची चाचणी करण्यात आली होती. परंतु सीएसईच्या या अहवालाच्या विश्‍वासार्हतेवर कंपन्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्ही भारतात नैसर्गिकरीत्या मिळणारे मध एकत्र करून त्याचेच वितरण करत असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. एफएसएसआयने मात्र मध कंपन्यांच्या सॅंपलची पुन्हा एकदा चाचणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
चीन मधून येते साखर 
फ्रुक्‍टोजच्या स्वरूपात चीन मधून मोठ्या प्रमाणावर साखरेची आयात होत असल्याचे सीएसईने सांगितले आहे. मागील काही वर्षांपासून 11 हजार टन साखरेची आयात चीन मधून होत आहे. 53 ते 68 रुपये प्रती किलोग्रॅमने बाजारात मिळणाऱ्या या साखरेचे मिश्रण करणे शक्‍य असल्याचे सीएसईने म्हटले आहे. 
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leading honey brands adulterated with Chinese sugar syrup reveals study