esakal | रामटेकडीत पाईपलाईनची गळती; पाणी पुरवठा विभागामार्फत तात्पुरते काम
sakal

बोलून बातमी शोधा

Waterline Leakage

रामटेकडीत पाईपलाईनची गळती; पाणी पुरवठा विभागामार्फत तात्पुरते काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेकडी (Pune) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान समोर गेली कित्येक दिवस झाले पिण्याची पाईपलाईनची गळती (Waterline Leakage) सुरू आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी (Drinking Water) दररोज वाया जात आहे. सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सगळीकडेच गंभीर होत असताना, मात्र लष्कर पाणी पुरवठा विभागामार्फत काम (Work) मात्र तात्पुरत्या स्वरूपात केले जात आहे. आज तर स्थानिक नागरिकांच्या मते ही पाणी गळती थांबविण्यासाठी अक्षरशः टायरच्या ट्यूब चा वापर करण्यात आला, मात्र कर्मचारी वर्गाने केलेला हा प्रयत्न निष्फळ ठरला, यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या गळतीचा प्रश्न सुटता सुटेना. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील या कडे प्रशासनाचे दूर्लक्ष होताना दिसत आहे. कायमस्वरूपी या ठिकाणी अशी पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे. व कायमस्वरूपी गळती थांबविण्यासाठी प्रयत्न न करता तात्पुरता स्वरूपात काम केले जात आहे.

रामटेकडीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक पहाटे पासून पाणी भरण्यासाठी फिरत असतात. आणि रामटेकडीतच अशा प्रकारे पिण्याचे पाणी वाया जात असेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे. असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

हे काम आम्ही तात्पुरत्या स्वरूपात केले होते, जर ह्या कामाने पिण्याच्या पाण्याचा गळतीचा प्रश्न सुटला नसेल तर लगेचच ही गळती थांबविण्यासाठी कामाला सुरुवात करू.

- प्रफुल्ल भटकर, कनिष्ठ अभियंता, लष्कर पाणी पुरवठा

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा