Video : टेमघर धरणाची गळती घटली ; दुरुस्ती यशस्वी

राजेंद्रकृष्ण कापसे
Tuesday, 6 August 2019

सध्याचे गळतीचे प्रमाण 250 लिटर प्रति सेकंद एवढे आहे. सध्या होणारी गळती गॅलरी मध्ये आहे. धरणाच्या निम्न बाजूस गळती आटोक्यात आली असून, येत्या वर्षी शॉटक्रीटचे काम पूर्ण झाल्यावर गॅलरी मधील गळती देखील आटोक्यात येणार आहे.

खडकवासला : टेमघर धरण यंदा सोमवारी रात्री 100 टक्के भरले. धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने 2106 मध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ती दुरुस्ती सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. धरण गळतीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून या धरण दुरूस्तीच्या कामाला यश आले आहे.

पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी ई-सकाळ शी बोलताना सांगितले की, "2016-17 मधील गळतीच्या तुलनेत सध्या गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. धरण दुरूस्तीच्या कामाला मोठे यश आले आहे. सध्याचे गळतीचे प्रमाण २५० लिटर प्रति सेकंद एवढे आहे. सध्या होणारी गळती गॅलरी मध्ये आहे. धरणाचा निम्न बाजुची गळती आटोक्यात आली आहे. येत्या वर्षी शॉटक्रीटचे काम पूर्ण झाल्यावर गॅलरी मधील गळती देखील आटोक्यात येणार आहे." 

धरण अधिक सुरक्षित
टेमघर धरणाची 2016 पूर्वी मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने टेमघर धरणाची सुरक्षा महत्वाची असल्याने राज्य सरकारने तातडीने गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यंदा गळतीमध्ये घट झाल्याने धरण अधिक सुरक्षित झाले असे पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leakage stopped from temghar dam pune