इंदापूर तालुक्यातील रुई गावात शिकाऊ विमान कोसळले

plane.
plane.
Updated on

बारामती - कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे शिकाऊ विमान आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील रुई या गावातील श्री बाबीर विद्यालया नजीक दुर्घटनाग्रस्त झाले. जवळपास साडेतीन हजार फूट उंचीवरून हे विमान जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या अपघातात विमानाचा पायलट सिद्धार्थ टायटस हा किरकोळ जखमी झाला, त्यासा गावातील स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी बारामती शहरात हलवले.

हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला स्पष्ट झालेले नसून, यासंदर्भात तपास सुरू आहे. मात्र अचानक विमान कोसळल्यामुळे या गावांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. 

यासंदर्भात कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी तातडीने संपर्क होऊ शकला नाही. यामध्ये या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com