

बारामती, ता. २० : येथील धों. आ. सातव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना लर्निंग ॲपचे वितरण करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा नियमित सराव तसेच विविध संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अतुल गांधी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सचिव हर्षवर्धन पाटील, सदस्य स्वप्नील मुथा, महावीर शहा, निखिल मुथा, संजय दुधाळ, हनुमंतराव पाटील, अरविंद गरगटे, विजय इंगळे, अतुल फरसोले आदी उपस्थित होते.