esakal | पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 
sakal

बोलून बातमी शोधा

rto pune

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात लर्निंग लायसन्सचा कोटा मर्यादित करण्यात आला होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार 21सप्टेंबरपासून दररोज सकाळी साडेसात वाजता लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी होणार आहे.

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी आता सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा दरम्यान घेण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे. येत्या सोमवारपासून (ता. 21 सप्टेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे 700 उमेदवारांना लर्निंग लायसन्स मिळणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात लर्निंग लायसन्सचा कोटा मर्यादित करण्यात आला होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 21 सप्टेंबरपासून दररोज सकाळी साडेसात वाजता लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी होणार आहे. सुमारे दीड तासांच्या एका बॅचमध्ये 100 उमेदवार असतील. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे 700 उमेदवारांना लर्निंग लायसन्स मिळू शकेल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले. हा कोटा वाढविण्यात आल्यामुळे अपॉइंटमेंट कोटा निश्‍चित करण्यासाठी संगणक प्रणालीमध्येही आवश्‍यक ते बदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा