

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेतील निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी अचानक सुट्टीवर जात असल्याने कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असणाऱ्यांना निवडणूक शाखेची परवानगी घेतल्याशिवाय रजा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश काढण्यात आले आहेत.