
पुणे : ‘‘लीला गांधी यांच्यासारख्या कलाकारांचा गौरव हा केवळ त्या व्यक्तीचा नाही, तर त्या शहराचा आणि क्षेत्राचाही गौरव असतो. त्यांच्यासारखे कलाकार हे पुण्याचे खरे वैभव आहे,’’ असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (ता. २४) काढले.