
सिंहगड रस्ता : वडगाव बुद्रुक येथील महापालिकेची शाळा क्रमांक २०४ बी मध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी करण्यासाठी पालक एकत्र आले. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नववीचे तीस विद्यार्थी शालाबाह्य राहिले आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी नववीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.