Dr. Radhika Shaha
sakal
इंदापूर - इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या पत्नी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व समाजभान जपणाऱ्या डॉ. राधिका संदेश शहा (वय ५५) यांचे मेंदू निकामी (ब्रेनस्ट्रोक) झाल्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात सोमवारी (ता. १२) रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून चौघांना नवे जीवन मिळाले आहे. शहा परिवाराने घेतलेल्या या निर्णयामुळे ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय आला.