

Lenyadri Mass Wedding
sakal
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अंध, अपंग दाम्पत्य व आदिवासी ठाकर समाजातील दांपत्याचा भव्य मोफत शाही विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात एकूण सहा जोडपी विवाहबद्ध झाली. रविवार ता. 2 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अश्वमेध युवा मंचच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंचचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.