नगर ः बिबट्याच्या हल्ल्यात भामाठाणला दुचाकीवरील आई, मुलगा जखमी

नगर ः बिबट्याच्या हल्ल्यात भामाठाणला  दुचाकीवरील आई, मुलगा जखमी
Published on

बिबट्याच्या हल्ल्यात भामाठाणला
दुचाकीवरील आई, मुलगा जखमी

अॅग्रोवन वृत्तसेवा
टाकळीभान, ता. श्रीरामपूर : भामाठाण (ता. श्रीरामपूर) येथे सकाळी दुचाकीवरून शेतात जात असलेल्या मायलेकरांवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना भामाठाण-खानापूर रोड परिसरात घडली. ६५ वर्षीय आईने धारदार विळ्याने बिबट्याचा प्रतिकार केल्याने दोघांचाही जीव वाचला.
रावसाहेब हरिश्चंद्र वाघ (वय ३६) व ताराबाई हरिश्चंद्र वाघ (वय ६५) अशी जखमींची नावे आहेत.
भामाठाण (ता. श्रीरामपूर) येथे सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून भामाठाण-खानापूर रोडने आपल्या शेताकडे जात असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. क्षणार्धात दुचाकीसह दोघे मायलेक रस्त्याच्या कडेला पडले. दरम्यान, ताराबाई बिबट्याच्या तावडीत सापडल्या. दोघांची झटापट सुरू झाली. या झटापटीत ताराबाई यांनी हातातील धारदार विळ्याने बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.
आईचा प्रतिकार आणि आरडाओरडा करत मदतीस धावून आलेल्या मुलामुळे बिबट्याने धूम ठोकत पळ काढला. मात्र, यामध्ये बिबट्याने पंजाने ताराबाई यांच्या डोक्यावर, हातावर व कानावर गंभीर जखमा केल्या. दुचाकीवरून पडल्याने रावसाहेब वाघ किरकोळ जखमी झाले. जखमींना अहिल्यानगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com