ढेंबरेवाडी शिवारात बिबट्याचा रेडकावर हल्ला,रेडकाचा मृत्यू,परिसरात भीतीचे वातावरण
ढेंबरेवाडी शिवारात बिबट्याचा रेडकावर हल्ला
पांगरी ः ढेंबरेवाडी (ता.बार्शी) शिवारात बिबट्याने रेडकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोळवेवाडी येथील शेतकरी लिंबराज घोळवे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर हा प्रकार घडला. घोळवे यांनी जनावरे गोठ्यात बांधून घरी गेल्यानंतर बिबट्याने अन्य जनावरांमधील सुमारे दीड वर्षांच्या रेडकावर हल्ला केला. या हल्ल्यात रेडका जागीच ठार झाले. हल्ल्यानंतर बिबट्याने रेडकाला जवळपास ५०० फूट अंतरावर डोंगराच्या दिशेने ओढत नेल्याचे दिसून आले. तेथे त्याच्या पाठीमागील भाग खाल्ल्याचे आढळले. २० रोजी याच परिसरात दोन-तीन महिलांना बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून हल्ला बिबट्याचाच असल्याचे सांगितले. सध्या सुगीचे दिवस सुरू असल्याने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची काढणी सुरू आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

