Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Leopard Attack on Farmer Couple in Junnar : औषध फवारणीचा पंप ढाल ठरल्याने बिबट्याच्या झडपेतून शेतकरी दाम्पत्य बचावले; वाढत्या हल्ल्यांमुळे आळेफाटा परिसरात भीतीचे सावट, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Leopard Attack on Farmer Couple in Junnar

Leopard Attack on Farmer Couple in Junnar

sakal

Updated on

बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) : येथील मेटांगळे मळा परिसरात शेतावर औषध फवारणीसाठी जात असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दत्तात्रय बाळाजी शिंदे हे थोडक्यात बचावले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोटारसायकलवरून खाली पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेटांगळे मळा येथे राहणारे दत्तात्रय बाळाजी शिंदे व त्यांच्या पत्नी विद्या शिंदे हे मोटारसायकलवरून शेतावर औषध फवारणी करण्यासाठी पंप घेऊन जात होते. मळ्यातील रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्याने शिंदे दाम्पत्याच्या दिशेने झेप घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com