संरक्षक कुंपणावरून उडी मारत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
कवठे येमाई, ता. १ : सविंदणे (ता. शिरूर) येथील पूर्व नरवडे मळा परिसरात बिबट्या भर वस्तीमध्ये शिरला. लोखंडी तारेच्या संरक्षक कुंपणावरून उडी मारत बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला व पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास उचलून नेले. ही घटना शनिवारी (ता. ३१) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविंदणे येथील शेतकरी संभाजी नरवडे यांच्या घरासमोर असलेल्या अंगणात बिबट्याने लोखंडी तारेच्या संरक्षक कुंपणावरून उडी मारली. त्यानंतर घरासमोर असलेल्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला जबड्यात पकडून पुन्हा कंपाउंड ओलांडून बाहेरच्या दिशेला निघून गेला. ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, सविंदणे भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र आता बिबट्या थेट कंपाउंड ओलांडून आत येत असल्याने लहान मुले, महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घ्यावी आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
01701
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

